खानापूर

सीमाभागातील उद्योजकांसाठी पुण्यात प्रेरणादायी मेळावा खानापूर मित्र मंडळ पुणे

खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणे आयोजित मार्गदर्शन मेळावा दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी सुवासिनी मंगल कार्यालय, धायरी, पुणे येथे संपन्न झाला. खानापूर, रामनगर, अळणावर, हलियाळ आणि सीमाभागातील पुणेस्थित उद्योजकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्याचे अध्यक्षस्थान मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. विजय पाटील यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री. भिमरावआण्णा तापकीर उपस्थित होते. व्यासपीठावर विश्वास ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब पोकळे, बीपीएल फौंडेशनचे अध्यक्ष श्री. दत्ताराम भेकणे, केपीएल फौंडेशनचे अध्यक्ष रामू गुंडप यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सचिव शिवाजी जळगेकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक करून केली. नंतर नवनिर्वाचित आमदारांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी शुभम शेळके आणि धनंजय पाटील यांच्या सहकार्याने आमदारांना निवेदन देण्यात आले.

यानंतर प्रसिद्ध उद्योजक मार्गदर्शक श्री. भालचंद्र पुराणीक आणि श्री. केशव जावळीकर यांनी उपस्थितांना उद्योगाशी संबंधित समस्या व उपायांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी व्यवसाय वृद्धीसाठी महत्त्वाच्या धोरणांवर चर्चा केली.

कार्यक्रमात मंडळाचे मावळते अध्यक्ष श्री. पीटर डिसोझा यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जरी ते अध्यक्षपदावरून बाजूला झाले असले तरी मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय राहतील. नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. विजय पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मंडळाला नवीन उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमात साधारणतः २५० उद्योजकांनी सहभाग घेतला. या उद्योजकांकडून दरवर्षी रु. ५०० कोटींची उलाढाल होते. वस्तू व सेवा करापोटी शासनाला रु. १०० कोटी व इतर करांद्वारे रु. ५० कोटी जमा होत असल्याची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशराम निलजकर व कुमार युवराज पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. देमानी मष्णूचे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लक्ष्मण काकतकर, बाळासाहेब देसाई, परशुराम चौगुले, रामचंद्र निलजकर, नारायण पाटील, अशोक पाटील, बाळकृष्ण पाटील, रामचंद्र बाळेकुंद्री, नारायण गावडे, पांडुरंग पाटील आणि राजाराम शिंदे यांसारख्या संचालकांनी अथक परिश्रम घेतले.


ಖಾನಾಪುರ ಸ್ನೇಹ ಬಳಗದ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಸಮ್ಮೇಳನ ಪುಣೆಯಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನಡೆಯಿತು

ಖಾನಾಪುರ (ಬೆಳಗಾವಿ) ಸ್ನೇಹ ಬಳಗವು ಡಿಸೆಂಬರ್ 12, 2024ರಂದು ಪುಣೆಯ ಧಾಯರಿಯಲ್ಲಿರುವ ಸುವಾಸಿನಿ ಮಂಗಳ ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಗಡಿಭಾಗದಲ್ಲಿ ಉದ್ಯಮಗಳನ್ನು ನಡೆಸುತ್ತಿರುವ ಪುಣೆಯ ಉದ್ಯಮಿಗಳಿಗಾಗಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ಆಯೋಜಿಸಿತು.

ಈ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ಬಳಗದ ನೂತನ ಅಧ್ಯಕ್ಷ ವಿಜಯ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ವಹಿಸಿದ್ದರು. ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಖಡಕ್ವಾಸ್ಲಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರಾದ ಭೀಮರಾವಣ್ಣ ತಾಪಕಿರ್ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಸಭೆಯಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸ ಗ್ರೂಪ್‌ನ ಬಾಲಾಸಾಹೇಬ ಪೋಕಳೆ, ಬಿಪಿಎಲ್ ಫೌಂಡೇಶನ್‌ನ ದತ್ತಾರಾಮ ಭೇಕಣೆ ಮತ್ತು ಕೆಪಿಎಲ್ ಫೌಂಡೇಶನ್‌ನ ರಾಮು ಗುಂಡಪ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.

ಸಭೆಯ ಪ್ರಾರಂಭವನ್ನು ಬಳಗದ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಶಿವಾಜಿ ಜಳಗೇಕರ್ ಮಾಡಿದರು. ನೂತನ ಶಾಸಕರಿಗೆ ಸತ್ಕಾರ ಮಾಡಲಾಯಿತು ಮತ್ತು ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಗಡಿಪ್ರಶ್ನೆಗಳ ಕುರಿತು ಚರ್ಚೆ ಮಾಡಲು ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು.

ಉದ್ಯಮಗಳ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಾದ ಭಾಲಚಂದ್ರ ಪುರಾಣಿಕ್ ಮತ್ತು ಕೇಶವ ಜಾವಳಿಕರ್ ಉದ್ಯಮಿಗಳ ಬಿಕ್ಕಟ್ಟುಗಳ ಪರಿಹಾರಕ್ಕೆ ಉಪಯುಕ್ತ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡಿದರು.

ಹಾಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪೀಟರ್ ಡಿಸೋಜ ಅವರಿಗೆ ಕೃತಜ್ಞತೆಯ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು. ಅವರು ತಮ್ಮ ಮಾತಿನಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲೂ ತಾವು ಭಾಗಿಯಾಗುವುದಾಗಿ ಭರವಸೆ ನೀಡಿದರು. ವಿಜಯ ಪಾಟೀಲ್ ತಮ್ಮ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಬಳಗವನ್ನು ಮತ್ತಷ್ಟು ಎತ್ತರಕ್ಕೆ ಕೊಂಡೊಯ್ಯಲು ಬದ್ಧತೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು.

ಸುಮಾರು 250 ಉದ್ಯಮಿಗಳು ಈ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು. ಈ ಉದ್ಯಮಿಗಳು ವರ್ಷಕ್ಕೆ ಸುಮಾರು ₹500 ಕೋಟಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುತ್ತಾರೆ, ಮತ್ತು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ₹100 ಕೋಟಿ ಜಿಎಸ್‌ಟಿ ಪಾವತಿಸುತ್ತಾರೆ.


English:

Khanapur Friends Association’s Guidance Summit Concludes Successfully in Pune

The Khanapur (Belgaum) Friends Association organized a guidance summit on December 12, 2024, at Suvasini Mangal Karyalaya, Dhayari, Pune, for entrepreneurs from border areas like Khanapur, Ramnagar, Alnavar, and Haliyal.

The summit was chaired by newly elected president Vijay Patil. Chief guest Bhimrao Anna Tapkir, MLA from Khadakwasla Constituency, graced the event. Other dignitaries included Balasaheb Pokale of Vishwas Group, Dattaram Bhekane of BPL Foundation, and Ramu Gundap of KPL Foundation.

The event began with an introductory address by Secretary Shivaji Jalgekar. Newly elected MLAs were felicitated, and a memorandum was submitted for discussion on border issues during Maharashtra’s winter assembly session.

Renowned industrial guides Bhalchandra Puranik and Keshav Jawlikar provided valuable insights on addressing business challenges and growth strategies.

Outgoing president Peter D’Souza was honored for his contributions, and he assured his continued active participation in future initiatives. Vijay Patil, in his presidential address, emphasized his commitment to taking the association to new heights.

Approximately 250 entrepreneurs attended the summit. It was reported that these entrepreneurs contribute ₹500 crores annually, with ₹100 crores paid as GST and ₹50 crores through other taxes.

The program was anchored by Parashram Niljkar and Kumar Yuvraj Patil, while Demani Mashnuche delivered the vote of thanks. The event’s success was attributed to the tireless efforts of directors like Laxman Kakatkar, Balasaheb Desai, Parashuram Chougule, and others.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते