खानापूर

खानापूर कुस्ती संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड

खानापूर : खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली. अध्यक्षपदी हणमंत गुरव, उपाध्यक्षपदी रुद्राप्पा हेंडोरी, सचिवपदी सदानंद होसूरकर, कार्याध्यक्षपदी राजाराम गुरव, तर खजिनदार म्हणून लक्ष्मण झांजरे यांची निवड झाली.

बैठकीत महत्त्वाचे निर्णय
कवळेमठ येथे लक्ष्मण बामणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटनेच्या वार्षिक अहवालाचा आढावा घेण्यात आला. यंदाचा कुस्ती आखाडा अधिक यशस्वी करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आला.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संघटनेच्या सदस्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या वेळी संघटनेचे पदाधिकारी पांडुरंग पाटील, अर्जुन देसाई, शंकर पाटील, यशवंत अल्लोळकर, जयवंत खानापूरकर, रामचंद्र पाटील, प्रकाश मजगावी, मधुकर पाटील, लक्ष्मण चाळगोंडे, नागाप्पा उचवडे यांच्यासह कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते