खानापूर

जांबोटी कृषी पत्तीनचे कर्ज वाटप आठवड्याभरात: सौ.धनश्री सरदेसाई

खानापूर(जांबोटी): गेल्यावर्षी घेतलेले कर्ज भरून दोन महिने संपत आले तरी जांबोटी- निलावडे कृषिपत्तीनकडून अद्याप यंदाचा कर्ज पुरवठा अजून का झाला नाही असे प्रश्न जांबोटी ओलमणी, चापोली परिसरातील शेतकऱ्यांतून विचारण्यात येत आहेत. 

यावर प्रतिक्रिया देताना जांबोटी कृषीपत्तीनच्या चेअरमन सौ. धनश्री सरदेसाई यांनी खानापूरवार्ताशी बोलताना सांगितले.

“गेले दोन महिने यावर आम्ही सतत काम करत आहोत. यंदा नवीन पत असल्याने कागदपत्रे जमवा जमव करण्यास वेळ लागत आहे. वाढलेले भागधारक तसेच भागातील काही शेतकऱ्यांच्या उताऱ्यांवर चार चार नावे असल्याने त्याचं पूर्ण बायफर्केशन करावं लागत आहे. सरकारच्या नियमानुसार कागदपत्रे व्यवस्थित बनवावी लागतात काही चुका झाल्यास  कागदपत्र परत येतात त्यामुळे या सर्व कामांना वेळ लागला. यंदा नवीन पत बनवली असून पुढील दोन वर्षे वेळेत कर्ज वाटप होईल. सध्या ही सर्व कामे पूर्ण झालेली असून पुढील आठवड्यापासून कर्ज वाटपाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या व्हॉट्सअपवर काही चुकीचे मेसेज, व्हिडिओज फिरत आहेत तरी अश्या मेसेजवर कोणी विश्वास ठेऊ नये. 

jamboti krishi Pattin

Jamboti krishi pattin

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते