खानापूर
ब्रेकिंग: हत्तरगुंजी येथे भरदिवसा चोरी, गांधीनगर येथील चोर गावकऱ्यांच्या ताब्यात

खानापूर: शहरापासून जवळचं असलेल्या हत्तरगुंजी गावात भरदिवसा घरात चोरी करताना गावकऱ्यांनी चोराला रंगे हात पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास गावकऱ्यांनी दोन चोरांना एका घरात चोरी करताना पाहिले असता सापळा रचून एकाला पकडण्यात यश आले आहे व एक चोर पळून गेला आहे. सदर चोर हे खानापूर गांधीनगर येथील असून दोन्ही चोर अल्पवयीन आहेत. चोराने स्वतःचे नाव इब्राइम अन्सारी असे सांगितले आहे.
गेल्या चार दिवसापासून गावातील कलमेश्वर मंदिरातील तसेच ज्ञानेश्वर मंदिरातील दानपेटी, घंटी , 16 हजारचे सोलार, शेतकऱ्यांच्या मोटर चोरी केल्या आहेत.
सध्या चोराला गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

One Comment