खानापूर तालुका भाजपा प्रधान कार्यदर्शीपदी मल्लाप्पा मारिहाळ, गुंडू तोपीनकट्टी
खानापूर : खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या प्रधान कार्यदर्शी पदी माजी उपसभापती मल्लाप्पा मारिया यांची निवड करण्यात आली आहे. तर गुंडू टोपिनकट्टी यांची देखील पुन्हा प्रधान कार्यदर्शीपदी निवड करण्यात आली असल्याचे पत्र तालुका भाजपा अध्यक्ष बसवराज सानीकोप यांनी प्रसिद्धीस दिले आहे. तालुका भाजपा अध्यक्ष पदी बसवराज स्वामी यांची निवड झाल्यानंतर तालुक्यातील इतर पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार खानापूर तालुका भाजपा प्रदान पारदर्शक पदी चापगावचे रहिवासी व माजी तालुका पंचायत उपसभापती मल्लाप्पा मारिहाळ यांची निवड झाली आहे. तर मागील पाच वर्षात यशस्वीरित्या प्रदान कारदर्शीपद सांभाळलेले भाजपाचे युवा नेते गुंडू तोपिनकट्टी यांचीही पुन्हा भाजपा प्रधान कार्यदर्शी पदी निवड करण्यात आली आहे. या दोघांच्या निवडीबद्दल खानापूर तालुक्यातील त्यांचे अभिनंदन होत आहे.
