बातम्या

इनरव्हिल क्लब ऑफ खानापूर यांचा पद‌ग्रहण सोहळा

खानापूर: इनरव्हिल क्लब ऑफ खानापुर यांचा पद‌ग्रहण सोहळा शनिवार दि. 27 जुलै 2024 रोजी लोकमान्य भवन खानापूर येथे संपन्न झाला. यावेळी स्थापना अधिकारी म्हणून जिल्हा संपादक सौ. शालिनी चौगुले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लोककल्प फांउडेशनच्या सी. एस. आर.सौ मालिनी बाली उपस्थित होत्या .


या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ आश्विनी पवार आणि सौ.आरती पाटील यांनी केले. तसेच स्वागत समारंभ सौ. अनिता गडाद यांनी केले.

इनरव्हील क्लबच्या उगवत्या , अध्यक्षा म्हणून सौ.शरयु कदम पाटील, उपाध्यक्षा सौ.गंधाली देशपांडे व सचिव म्हणून सौ समृध्दी सुळकर उप सचिव म्हणून सौ वर्षा देसाई, खजिनदार सौ अश्विनी पवार आय एस ओ  सौ. दिप्ति बडदाली संपादक सौ मिता देवूळकर यांनी अधिकार ग्रहण केले.

यावेळी शालिनी चौगुले मॅडम यांनी इनरव्हील क्लबला शुभेच्छा देत असेच सामाजिक कार्य  करण्या‌साठी प्रोत्साहित केले. त्याप्रमाणे आपल्या कार्यक्रमला लाभलेल्या प्रमुख पाहुन्या सौ.मालिनी बाली मॅडम यांनीही आपल्या क्लबला असेच कार्य करण्यास प्रोत्साहीत केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन खानापूर तालुक्यातील शेतकरी महिलांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तु देउन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री रविसागर उप्पीन, श्री. ऍड.चेतन मनेरीकर, • श्री सुभाष देशपांडे, श्री शिवानंद सुळकर व श्री विनायक जोरापूर श्री सुधिर पाटील तसेच सौ मेघा कुंदरगी उपस्थित होत्या.

यावेळी उगव‌त्या अध्यक्षा सौ शरयु, कदूम यांनी येत्या काळात आरोग्य पर्यावरण, व शैक्षणिक कार्यात सेवा बजावू “अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाची सांगता सौ समृद्धी सुळकर यांनी आभार व्यक्त करून केली..

innerwheel club Khanapur

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते