खानापूर

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना, तिघांचा मृत्यू

Pune Helicopter Crash : पु्ण्यात धक्कादायक हेलिकॉप्टरच्या अपघाताची घटना समोर आली आहे.  पुण्याच्या( बावधन बुद्रुक )परिसरात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रुमला या घटनेची माहिती मिळाली. एका रिसॉर्टवरच्या हेलिपॅडवरुन उड्डाण केलेल्या हेलिकॉप्टरला हा अपघात झाला.

सकाळच्या सुमारास धुके असलेल्या डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळले. हा अपघात नेमका कशामुळे घडला याची माहिती समोर आलेली नाही. या हेलिकॉप्टरमध्ये तिघे होते आणि तिघांचाही मृत्यू झाला. या परिसरात एकमेक हेलिपॅड असल्यामुळे अनेक महत्त्वाच्या व्यक्ती तिथे येत असतात. घटनेची माहिती पोलिसांसह, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आहे.

अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे तिन्ही मृतदेह गंभीररित्या जळाले. हेलिकॉप्टर सरकारी की खासगी हे अद्याप समजू शकलेले नाही. मृतांचीही ओळख पटू शकली नाही.

दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताची ४० दिवसातील पुण्यातील दुसरी घटना आहे. याआधी २४ ऑगस्ट रोजी पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले होते. हे हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादला जात होते. त्यात एक पायलट आणि तीन प्रवासी होते. या अपघातात पायलट जखमी झाला. उर्वरित तीन जणांना गंभीर दुखापत झाली नाही.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या