खानापूर

खानापूर येथे हृदयविकारावर  आरोग्य शिबिर

खानापूर: येथील इन्नरव्हील क्लब आणि लायन्स क्लब या सेवाभावी संस्थांच्या वतीने शनिवार दि.28 सप्टेंबर रोजी दु. 3 वाजता शिवस्मारक खानापूर येथे हृदय विकारावर  संबंधित आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रासह, गुजरात, उत्तरप्रदेश राजस्थान, छत्तीसगड येथे विविध क्लिनिक च्या माध्यमातून सेवा देणारे वृत्तवाहिन्यात, अनेक व्याख्याने देऊन हृदय रोगावर प्रभावी मार्गदर्शन करणारे. मुंबई येथील प्रसिद्ध माधवबाग हॉस्पिटल चे हृदय रोग तज्ञ डॉ. निलेश कुलथे,तसेच हृदयरोगावर आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार यावर 12 वर्षे चिकित्सात्मक संशोधन केलेल्या डॉ. संगीता खांजे उपस्थित राहणार आहेत. तेंव्हा या आरोग्यशिबिराचे लाभ घेऊन हृदयरोगासंबंधी समस्या आणि उपचार जाणून घेण्याचे आवाहन इन्नरव्हील क्लब आणि लायन्स क्लब यांनी केले आहे.

Health camp in Khanapur

lions club Khanapur

innerwheel club khanapur

word health day 2024

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते