खानापूर

हलशी महालक्ष्मी यात्रेसाठी रेडा सोडण्याचा सोहळा 6 मे रोजी

खानापूर: हलशी व हलशीवाडी येथे 2026 मध्ये होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक रेडा सोडण्याचा विधी मंगळवार, 6 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता श्री महालक्ष्मी मंदिरासमोर पार पडणार आहे.

विधीपूर्वी पौराणिक नृसिंह-वराह मंदिरात गाऱ्हाणे उतरविले जाणार असून, त्यानंतर रेड्याची भव्य मिरवणूक महालक्ष्मी मंदिरापासून सुरुवात होऊन गावातील विविध देवतांना – थळदेव, हलशीवाडी थडेदेव, म्हारताळ देव इत्यादी – भेटी देत पुढे जाईल. या मिरवणुकीनंतर गावात घरोघरी रेड्याचे पूजन केले जाईल.

या पारंपरिक विधीच्या अनुषंगाने २२ एप्रिलपासून दर मंगळवार आणि शुक्रवार वारांचे पालन करण्यात येत होते. आता या आठवड्यातील पाचव्या मंगळवारी हा मुख्य सोहळा होणार असल्याने संपूर्ण हलशी व हलशीवाडी गावात जय्यत तयारी सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून घरोघरी सजावट, भंडाऱ्याची उधळण, पूजा-अर्चा यामुळे गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे.

हजारो भाविक या पारंपरिक सोहळ्यास साक्षी राहण्यासाठी उपस्थित राहणार असून, गावात उत्सवाचे व सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?