बातम्या

हाडलगा-चापगावं रोड ची दुरावस्था

खानापूर: दरवर्षी प्रमाणे यंदाही हाडलगा-चापगाव रस्त्याची  अवस्था अत्यंत बिकट झालेली असून,साधी मोटार सायकल तर सोडाच पण चालून जाणे देखील मुश्किल होऊन बसले आहे.

गेल्या पंधरा वीस दिवसांपासून झालेल्या पावसामुळे रस्त्यावर भल्या मोठ्या चरी पडल्या आहेत. रस्त्यावर प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे अपरात्री येणाऱ्या जाणाऱ्या  वाहनांना खड्डे दिसत नसल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत.

गावातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अन्य गावांना जायचे झाल्यास या रस्त्यांवरून गाड्या घालणं मुश्किल झालं आहे. मोठ्या गाड्या ठिकठिकाणी चिखलात अडकत आहेत. तर दुचाकी चिखलात अडकून खराब  होत आहेत.

तरी जबाबदार प्रशासनाने याकडे लवकर लक्ष देऊन या रस्त्याचे काम मार्गी लावावे. रस्ता तात्काळ दुरु स्ती करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

road conditions in Khanapur

khanapur villeges roads

Heavy Rain in Khanapur

Heavy Rain in Jamboti

Heavy Rain in Kankumbi


Villages & Towns in Khanapur Taluka of Belgaum, Karnataka

Khanapur Taluka Belgavi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते