खानापूर

रात्री अचानक घरच्या मागील बाजूने आग, चापगाव येथे घडले काही असे

खानापूर: चापगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळ सलेल्या एका गरीब कुटुंबाच्या घराला रात्री अचानक शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे.

येथील यल्लाप्पा मदार यांच्या निवासस्थानी रात्री साडेदहाच्या सुमारास आतील खोलीतून धूर येत असल्याचे निदर्शनास आले.

घरातील कुटुंबीय जेवण्याची आणि झोपण्याची तयारी करत असताना अचानक ते घरातून धूर कसा येत आहे हे पाहण्यासाठी गेले असता घराला मागच्या बाजूने आग लागल्याचे दिसले आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला.

परिसरातील नागरिकांनी तात्काळ एकत्र येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. खबरदारी म्हणून घरातील वीज पुरवठा खंडित करून आग विझवण्यात आली.

लाल कौलारू घर आणि जुन्या छताला अचानक आग लागली आणि संपूर्ण छत जळून खाक झाले.
वरच्या बाजूने काढून आग विझवण्यात आली.

आग विझवल्यानंतर अग्निशमन दल दाखल झाले. या आगीत संबंधित कुटुंबाच्या घरातील काही पैसे व दागिने जळून खाक झाले आगीत जळून खाक झाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची नोंद नंदगड पोलिसात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते