बनावट नोटा, बेकायदेशीर गुंतवणूक आणि गांजावर नागरिकांचा आक्रोश

दांडेली(प्रतिनिधी)– दांडेलीतील काही सजग नागरिकांनी डीवायएसपी साहेबांना निवेदन सादर करत शहरातील गंभीर आणि संशयास्पद घडामोडींविषयी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत:
नागरिकांच्या मते, शहरात अलीकडे सुमारे 14 कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या असून, त्या ठिकाणी नोटा मोजण्याचे मशीन देखील सापडले आहे. विशेष म्हणजे संबंधित व्यक्ती अनेक दिवसांपासून घरी नव्हती आणि संपर्क केल्यानंतर समजले की ती तिन्ही दिवसांपासून गायब आहे. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत संशयास्पद असून, दांडेली शहराबाबत समाजात चुकीचा संदेश जात आहे.
यावेळी सुनिल हेगडे म्हणाले दांडेली हे प्रसिद्धीसाठी ओळखले जावे, कुख्यातीसाठी नव्हे, असे नागरिकांचे स्पष्ट मत आहे. शहराच्या विकासासाठी आणि चांगल्या प्रतिष्ठेसाठी अशा प्रकरणांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
तसेच, बाहेरून येणारे काही लोक दांडेलीमध्ये बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, मनी लाँडरिंग, आणि रिअल इस्टेटमध्ये बेकायदेशीर गुंतवणूक करत असून, सुब्रजिस्टर ऑफिसमधून चुकीच्या व्हॅल्युएशन्स करून कोट्यवधी रुपयांची रिसॉर्ट्सची खरेदी केली जात आहे. या व्यवहारांतून ना शासनाला महसूल मिळतो, ना स्थानिकांना नोकऱ्या. हे सर्व पाहता, दांडेलीमध्ये आर्थिक गुन्हेगारी वाढत चालली आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.
याशिवाय, गांजाचा प्रश्न गंभीर होत चालला असून, हलियाळ भागात गांजाचे सेवन ही एक मोठी समस्या झाली आहे. अंदाजे 20 वर्षांखालील अनेक तरुण गांजाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे गांजाच्या साठा व वितरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्याची गरज आहे.
शहरात बाहेरून आलेल्या लोकांनी बाडगे घरांमध्ये राहून काहीही काम न करता वेळ घालवण्याचे प्रकार वाढले असून, त्यांच्यावर आधार कार्डच्या माध्यमातून देखरेख ठेवण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
या सर्व मुद्द्यांवर डीवायएसपी कार्यालयाने सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. भविष्यात अधिक माहिती आणि पुरावे देण्यात येतील, असेही नागरिकांनी सांगितले.
ದಾಂಡೇಲಿಯಲ್ಲಿ ನಕಲಿ ನೋಟು, ಗಾಂಜಾ ವ್ಯಸನ ಹಾಗೂ ಅಕ್ರಮ ಹಣವಹಿವಾಟು – ನಾಗರಿಕರಿಂದ ಡಿವೈಎಸ್ಪಿಗೆ ಮನವಿ
ದಾಂಡೇಲಿ ನಗರದಲ್ಲಿ ₹14 ಕೋಟಿ ಮೌಲ್ಯದ ನಕಲಿ ನೋಟು, ನೋಟು ಎಣಿಕೆಯ ಯಂತ್ರ ಪತ್ತೆಯಾಗಿದ್ದು, ಈ ಹಿಂದೆನೂ ಇಲ್ಲದ ರೀತಿಯ ಅಕ್ರಮ ಚಟುವಟಿಕೆಗಳು ಬೆಳಕಿಗೆ ಬರುತ್ತಿವೆ. ಸಂಬಂಧಿತ ವ್ಯಕ್ತಿ ಮೂರು ದಿನಗಳಿಂದ ನಾಪತ್ತೆಯಾಗಿದ್ದು, ವಿಷಯ ಮತ್ತಷ್ಟು ಗಂಭೀರವಾಗಿದೆ.
ಇದೇ ವೇಳೆ, ಹಳಿಯಾಳ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಗಾಂಜಾ ಸೇವನೆಯ ಪ್ರಮಾಣ ಗಂಭೀರವಾಗಿದ್ದು, 20 ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಕಡಿಮೆ ವಯಸ್ಸಿನ ಮಕ್ಕಳು ಇದರ ವಶವಾಗುತ್ತಿದ್ದಾರೆ.
ಈ ಅಕ್ರಮ ಚಟುವಟಿಕೆಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ outsiders ಬಾಡಿಗೆ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿ ಹಣದ ಅವ್ಯವಹಾರ, ಅಕ್ರಮ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಶನ್ ಮೂಲಕ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ರಿಸಾರ್ಟ್ ಖರೀದಿಗಳು ನಡೆಯುತ್ತಿರುವುದು ಸಾಮಾಜಿಕ ಚಿಂತೆ ಮೂಡಿಸಿದೆ.
ಈ ಎಲ್ಲ ಕುರಿತು ಗಂಭೀರ ತನಿಖೆ ನಡೆಸಿ, ತಪ್ಪಿತಸ್ಥರ ವಿರುದ್ಧ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಎಂಬುದು ನಾಗರಿಕರ ಮನವಿ.
