खानापूर
कसबा नंदगडमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
नंदगड (ता. खानापूर) : कसबा नंदगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण आज शुक्रवार, दि. ६ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पी. के. पी. एस.चे अध्यक्ष मा. पी. एच. पाटील भूषवणार आहेत. पुतळ्याचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर आणि माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते होईल.
या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, ग्रामस्थांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.