खानापूर

काँक्रीट मिक्सर लॉरी कारवर उलटली, दोघे गंभीर जखमी

बेळगाव : शनिवारी सकाळी केएलई हॉस्पिटलजवळील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या संपर्क रस्त्यावर भीषण अपघात झाला. काँक्रीट मिक्सर लॉरी (केए-25 एमडी 6506) एका कारवर उलटल्याने कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले. हे दोघे बागलकोट येथील रहिवासी आहेत.

सुदैवाने त्यांचा जीव वाचला असला तरी कारचा पूर्णपणे चुराडा झाला. जखमींवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच रहदारी पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने बचावकार्य करून दोघांना सुखरूप बाहेर काढले.

या घटनेची नोंद रहदारी उत्तर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम करत आहेत.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते