खानापूर

दुचाकी-टेम्पो धडक; जळगे येथील दोन तरुण जखमी

बेळगांव– खानापूर रोडवरील दुसऱ्या रेल्वे फाटकाजवळ  भरधाव दुचाकी मालवाहू टेम्पोवर आदळल्याने दोन तरुण जखमी झाले. यामध्ये दुचाकी चालक गंभीर तर मागे बसलेला तरुण किरकोळ जखमी झाला.

जखमींची नावे दीपक प्रकाश गुरव आणि वैभव सुनील कागीनगर (दोघेही रा. गुरव गल्ली, जळगे, करंबळ, ता. खानापूर) अशी आहेत. दोघेही कामानिमित्त बेळगावला आले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास ते खानापूर रोडमार्गे जात असताना, दुसऱ्या रेल्वे फाटकाजवळील गतीरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले.

गतीरोधकावरून जोरात गेल्यामुळे दुचाकी थेट समोरून येणाऱ्या मालवाहू टेम्पोवर आदळली. या अपघातात दोघेही रस्त्यावर फेकले गेले. दीपकच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली असून वैभव किरकोळ जखमी झाला आहे.

या प्रकरणी वैभवने दिलेल्या फिर्यादीवरून रहदारी दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?