खानापूर

प्रथम तिला भोसकले नंतर स्वतःलाही संपवले,  एकच खळबळ…

बेळगाव :प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर चाकू हल्ला करून तिचा खून केल्याची तसेच स्वतःलाही चाकूने वार करून संपवल्याची खळबळजनक घटना खासबाग सर्कल जवळील एका घरात आज मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. या भीषण घटनेमुळे संपूर्ण शहापूर हादरले आहे.

मयत दुर्दैवी युवतीचे नांव ऐश्वर्या लोहार (वय 19, रा. नवी गल्ली शहापूर) असे असून तिच्या प्रियकराचे नाव प्रशांत कुंडेकर (वय 29, रा. येळ्ळूर) असे आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत आणि ऐश्वर्या यांचे गेल्या वर्षभरापासून प्रेम प्रकरण सुरू होते. यातून वाद निर्माण होऊन प्रशांत याने आज दुपारी ऐश्वर्या हिला खासबाग सर्कल जवळील ओळखीच्या घरात एकांतात बोलावून घेतले. त्या ठिकाणी दोघांच्यात वादावादी होऊन त्याचे पर्यवसान प्रशांत कुंडेकर यांने धारदार चाकूने ऐश्वर्या हिच्यावर हल्ला करण्यामध्ये झाले. चाकूचा वार वर्मी लागल्याने घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून ऐश्वर्या गतप्राण झाली.

पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग पोलीस उपायुक्त रोहन जगदीश  यांनी देखील घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. सदर भीषण घटनेमुळे परिसरात खळबळ उडून संपूर्ण शहापूर हादरले आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या