बैलूर ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे काम सुरू – 20 लाखांचा निधी मंजूर
बैलूर (ता. खानापूर) ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या पायाभरणीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा अरोही सावंत आणि त्यांचे पती, सामाजिक कार्यकर्ते अनंत सावंत यांनी पूजेचे यजमान म्हणून उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाचे सर्व धार्मिक विधी विधिपूर्वक पार पडले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप कवठणकर, लक्ष्मण बन्नार, रवींद्र गुरव, कांचन बिर्जे, मनोहर कांबळे, टी.के. बिर्जे आणि पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

20 लाखांचा निधी मंजूर – पहिल्या मजल्यापर्यंतचे काम प्रगतीपथावर
ग्रामपंचायत इमारतीसाठी शासनाकडून 20 लाखांचा निधी मंजूर झाला असून, त्यातून पहिल्या मजल्यापर्यंतच्या कामाची पूर्तता होणार आहे. या निधीतून कार्यालयीन संगणक खोली, पीडीओ खोली आणि विविध कार्यालयीन दालनांची उभारणी केली जाणार आहे.

मीटिंग हॉलसाठी 10 लाख राखीव – निर्णय पुढील कमिटीवर अवलंबून
याशिवाय, पहिल्या मजल्यावरील मीटिंग हॉलसाठी 10 लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे. मात्र, सद्याच्या पंचायतीचा कार्यकाळ संपत आल्याने हे काम सध्याच्या कमिटीच्या कार्यकाळात होईल की पुढील कमिटीच्या कार्यकाळात, हे मुख्य कामाच्या गतीवर अवलंबून राहील. हे काम वेळेत पूर्ण करून वरच्या मजल्यावरील मीटिंग हॉल उभारण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे ग्रामपंचायत अध्यक्षा अरोही सावंत यांनी सांगितले.