खानापूर
खानापूर रस्त्यावर अज्ञात इसमाचा अपघात, प्रकृती नाजूक
प्रभूनगर: खानापूर-बेळगांव रस्त्यावर प्रभुनगर येथे सुमारे 7:30 वाजता अज्ञात इसमाचा अपघात झाला आहे. या अपघातात Bajaj CT100 (गाडी क्रमांक KA22HG0353) या दुचाकीचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त इसमाला खानापूरच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती नाजूक असल्याचे समजते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
— (प्रतिनिधी)