खेळ
भारत सेमी फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय
Icc t20 World Cup 2024
IND vs AUS Highlights, T20 World Cup 2024: सेंट लुसियाच्या ग्रास आयलेट येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुपर राऊंडच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह त्यांनी अपराजित संघ म्हणून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
इतकंच नाही तर टीम इंडियाने वनडे विश्वचषकातील अंतिम पराभवाचा बदलाही घेतला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 206 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला २० षटकांत ७ गडी गमावून १८१ धावांपर्यंतच मजल मारता आली.
आता उपांत्य फेरीत गुरुवारी भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
ind vs aus highlights
india vs australia match highlights 2024