खानापूर

मलप्रभा नदी पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला! पोलिसांकडून तपास सुरू

बल्लोगा (ता. खानापूर) : बल्लोगा परिसरातील मलप्रभा नदीच्या पात्रात आज एका अनोळखी पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मृतदेहाची अवस्था पाहता मृत्यू झाल्याला काही वेळ झाल्याचे प्राथमिक निरीक्षणातून समोर आले आहे.

सध्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून विविध अंगाने तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?