खानापूर

बेळगांवहून निघालेला डिझेल टँकर कॅसलरॉकजवळ पलटी

रामनगर: जोयडा तालुक्यातील कॅसलरॉक येथे कलंबली क्रॉसजवळ डिझेलने भरलेला टँकर पलटी होऊन गंभीर अपघात झाला आहे. या अपघातामुळे टँकरमधील डिझेल रस्त्यावर पूर्णपणे गळून धोका निर्माण झाला आहे.

देसुरहून कॅसलरॉककडे निघालेल्या टँकरचा हा अपघात घडला. टँकर रस्त्यावर आडवा झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून टँकर हटवण्याचे प्रयत्न संध्याकाळी  उशिरापर्यंत सुरू होते.

whatsapp
Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते