क्राईमबेळगाव

दिर, जाऊ आणि पुतण्या मालमत्ता हडपण्यासाठी काळी जादू करतात: सुनेचा आरोप

बेळगाव : बेळगावच्या माजी खासदाराच्या सुनेने आपली मालमत्ता हडपण्यासाठी दिर, जाऊ आणि पुतण्या तंत्रमंत्र आणि काळ्या जादूचा वापर करतात अशी तक्रार कॅम्प पोलीस स्थानकात केली आहे. दीपा सिदनाळ असे त्यांचे नाव असून बेळगावचे दिवंगत खासदार खासदार एस. बी सिदनाळ यांची सून आणि प्रसिद्ध व्हीआरएल ग्रुपचे संस्थापक विजय संकेश्वर यांची मुलगी आहे.

जादू टोणा, मंत्र तंत्र आणि काळी जादू करून माझ्या पतीचा बळी घेतला असून आता ते विजयकांत डेअरी आणि अन्य मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करत आहेत असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

अनोळखी व्यक्ती येते आणि आपल्या घराजवळ लिंबू आणि अन्य साहित्य ठेवून जाते असे सांगत शशिकांत सिदनाळ यांच्या पत्नी वाणी, मुलगा दिग्विजय आणि अन्य एका अनोळखी व्यक्ती विरोधात दीपा सिदनाळ यांनी तक्रार नोंदवली आहे.

पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीमुळे सगळीकडे हा चर्चेचा विषय बनला आहे. भादंवि कलम १२० बी,५०६,३७ तसेच काळी जादू प्रतिबंधक कायदा २०१७ नुसार कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

खानापूर एक्सप्लोर करा khanapur news

बेळगांव एक्सप्लोर करा belgavi news

कर्नाटक एक्सप्लोर करा Karnataka news

source: dmedia

#Khanapur Khanapur belgav news khanapur belgavi district news in Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते