भीमगड परिसरातील 754 कुटुंबांचे स्थलांतर: योग्य मोबदला व पुनर्वसनाची हमी – मंत्री ईश्वर खांड्रे

खानापूर( तळेवाडी): भीमगड वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्यात येणार असून त्यासाठी योग्य मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन वन, जीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खांड्रे यांनी दिली आहे.

सोमवारी रात्री तळेवाडी येथे मंत्री खांड्रे यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांची बैठक घेतली. या बैठकीत गावकऱ्यांनी स्वेच्छेने स्थलांतर करण्यास सहमती दर्शविल्यास सरकारकडून नुकसानभरपाई देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री खांड्रे यांनी सांगितले की, “भीमगड वनक्षेत्रात 754 कुटुंबे व 3059 लोक 13 वस्त्यांमध्ये राहतात. कोंगळा मध्ये 63 कुटुंबे, पास्तोलीमध्ये 36, गवाळी 90, अबनाळीमध्ये 81, जामगावमध्ये 82, हेम्मडगामध्ये 128, तळेवाडीत 13, देगावमध्ये 31, पालीमध्ये 73, मेंडिलमध्ये 40, कृष्णापूरमध्ये 12, होल्डामध्ये 7 आणि आमगावमध्ये 98 कुटुंबे आहेत. या सर्व कुटुंबांसोबत 1530 पुरुष आणि 1443 महिला, एकूण 3059 जण येथे राहतात.
संपूर्ण गावाने स्थलांतरास सहमती दर्शविल्यास पुनर्वसनासाठी आवश्यक तो मोबदला देऊन प्रक्रिया राबवली जाईल.”
गावकऱ्यांना संबोधित करताना मंत्री खांड्रे यांनी विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी दिल्या जाणाऱ्या रकमेचा योग्य वापर कसा करावा तसेच सरकारने अरण्यवासीयांना 15 लाख रुपयांचा पुनर्वसन किट देण्याची तयारी केली असून, त्यांना बाहेरील खरेदी केलेल्या जमिनीवर घरं बांधून स्थिर जीवन देण्यासाठी योजना केली आहे तसेच शासनाकडून विशेष काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक व वनदल प्रमुख ब्रिजेशकुमार दीक्षित, उपमुख्य वनसंरक्षक कुमार पुष्कर, बेळगावचे मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चौहान, उप वनसंरक्षक मारिया क्रिस्तू राज, सहायक वनसंरक्षक सुनीता निंबरगी, सर्व परिमंडळ वन अधिकारी, वन विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. बैठकीस खानापूर उपविभाग व कर्मचारी उपस्थित होते.

ಭೀಮಗಡ್ ಪ್ರದೇಶದ 754 ಕುಟುಂಬಗಳ ಸ್ಥಳಾಂತರ: ಸರಿಯಾದ ಪರಿಹಾರ ಮತ್ತು ಪುನರ್ವಸನದ ಭರವಸೆ – ಸಚಿವ ಈಶ್ವರ ಖಾಂಡೆರೆ
ತಲೆವಾಡಿ: ಭೀಮಗಡ್ ಅರಣ್ಯ ಪ್ರದೇಶದ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಸ್ಥಳಾಂತರ ಕ್ರಮವಾಗಿ ನಡೆಯಲಿದೆ ಮತ್ತು ಅದಕ್ಕಾಗಿ ಸರಿಯಾದ ಪರಿಹಾರ ನೀಡಲಾಗುವುದು ಎಂದು ಅರಣ್ಯ, ಜೀವಶಾಸ್ತ್ರ ಮತ್ತು ಪರಿಸರ ಸಚಿವ ಈಶ್ವರ ಖಾಂಡೆರೆ ಭರವಸೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ.
ಸೋಮವಾರ ರಾತ್ರಿ ತಲೆವಾಡಿ ನಲ್ಲಿ ಸಚಿವ ಖಾಂಡೆರೆ ಅವರು ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯ ಹಿರಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳೊಂದಿಗೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಸಭೆಯನ್ನು ನಡೆಸಿದರು. ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಸ್ವಯಂಪ್ರೇರಿತವಾಗಿ ಸ್ಥಳಾಂತರಕ್ಕೆ ಒಪ್ಪಿಗೆಯನ್ನು ಸೂಚಿಸಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಪರಿಹಾರ ನೀಡಲಾಗುವುದು ಎಂದು ಅವರು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದ್ದಾರೆ.
ಮंत्री ಖಾಂಡೆರೆ ಅವರು ಹೇಳಿದರು: “ಭೀಮಗಡ್ ಅರಣ್ಯ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ 754 ಕುಟುಂಬಗಳು ಮತ್ತು 3059 ಜನರು 13 ವಸ್ತುಗಳಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಸಂಪೂರ್ಣ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಸ್ಥಳಾಂತರಕ್ಕೆ ಒಪ್ಪಿಗೆಯನ್ನು ಸೂಚಿಸಿದರೆ, ಪುನರ್ವಸನಕ್ಕಾಗಿ ಅಗತ್ಯವಾದ ಪರಿಹಾರವನ್ನು ನೀಡಿ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಅನುಷ್ಠಾನಗೊಳಿಸಲಾಗುವುದು.”
ಗ್ರಾಮಸ್ಥರನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ, ಸಚಿವ ಖಾಂಡೆರೆ ಅವರು ಸ್ಥಳಾಂತರಿತರಿಗೆ ನೀಡಲಾಗುವ ಪರಿಹಾರದ ಬಗ್ಗೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ವಿಶೇಷ ಗಮನ ನೀಡಲಾಗುವುದು ಎಂದು ಭರವಸೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ.
754 Families in Bhimgad Area to be Relocated: Minister Eshwar Khandre Assures Adequate Compensation and Rehabilitation
Talevadi: Minister of Forests, Ecology, and Environment, Eshwar Khandre, has assured that the relocation of villagers from the Bhimgad forest area will proceed in phases, with appropriate compensation provided.
On Monday night, Minister Khandre, along with senior officials from the Forest Department, held a meeting with villagers in Talevadi. During the meeting, villagers expressed their willingness to relocate voluntarily, and the minister confirmed that the government is prepared to offer compensation.
Minister Khandre stated, “Currently, 754 families and 3059 individuals reside in 13 settlements within the Bhimgad forest area. If the entire village agrees to relocate, the process will be carried out with compensation for rehabilitation.”
Addressing the villagers, Minister Khandre emphasized that the government will pay special attention to the compensation provided to the displaced individuals for their rehabilitation.

