खानापूर
मैत्रिणीच्या लग्नाला गेलेली तरूणी बेपत्ता
बेळगाव: नागेनहट्टी (ता. बेळगाव) येथील विद्या जोतिबा शहापूरकर (वय 25) ही तरुणी मैत्रिणीच्या लग्नासाठी घराबाहेर पडली आणि त्यानंतर परतच न आल्याने तिचा बेपत्ता असल्याचा गुन्हा हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
शनिवार, 17 मे रोजी दुपारी 4 वाजता ती मैत्रिणीच्या लग्नाला जात आहे, असे सांगून घरातून निघाली होती. मात्र, 12 दिवस उलटून गेले तरी ती घरी परतली नाही, यामुळे तिच्या वडिलांनी गुरुवारी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
पोलीस विद्या शहापूरकर यांचा शोध घेत असून, तिच्याविषयी काही माहिती मिळाल्यास हिरेबागेवाडी पोलीस स्थानकातील 9480804032 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.