येडियुरप्पा यांच्याविरोधात लैंगिक गुन्हा(पॉक्सो) दाखल करणाऱ्या महिलेचा मृत्यू
बेंगलुरू: भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी 17 वर्षीय मुलीवर आपल्या डॉलर कॉलनीतील राहत्या घरी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेचा रविवारी (२६ मे) बेंगळुरूतील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
पोलीस विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 53 वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने 26 मे रोजी रात्री एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने रुग्णालयात तिचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.Complainant in POCSO case against ex-CM Yediyurappa dies in Bengaluru पोलिस विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला फुफ्फुसाच्या कर्करोगाने (lung cancer) ग्रस्त होती.
येडियुरप्पा यांच्याविरोधात त्यांनी 14 मार्च रोजी सदाशिवनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर राज्य सरकारने दुसऱ्याच दिवशी हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग केले. सध्या या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीआयडीने आतापर्यंत सीआरपीसीच्या कलम 164 अन्वये पीडित आणि आईचे जबाब नोंदवले आहेत.
या महिलेच्या पश्चात 17 वर्षांची मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. पॉक्सो तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, लैंगिक शोषण, फसवणूक आणि इतर गुन्ह्यांच्या संदर्भात मी आणि मुलगी येडियुरप्पा यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेले होते. 2 फेब्रुवारी रोजी मदत मागण्यासाठी गेलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. सदाशिवनगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस अधिकारी, राजकारणी, व्यापारी अशा एकूण 53 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.