खानापूर

खानापूर: शेतजमिनीच्या वादातून महिलेस बेदम मारहाण, आरोपींविरोधात गुन्हा दाखल

खानापूर: बेळगाव येथील काही तरुणांनी बैलूर (ता. खानापूर) येथे एका महिलेस बेदम मारहाण करून तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात लक्ष्मी रवळू कागणकर (वय ४५) गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी बेळगाव येथील श्रीधर पाटील याच्यासह अन्य आठ जणांविरोधात खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतजमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे समजते. आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

घटनेचा तपशील:
लक्ष्मी कागणकर आणि गावातील मारूती केरू गुरव यांच्यात अनेक वर्षांपासून शेतजमिनीचा वाद सुरू आहे, जो न्यायप्रविष्ट आहे. रविवारी (ता. १९) श्रीधर पाटील आणि इतर आठ जणांनी कागणकर यांच्या शेतातील घरात घुसून जमिन आपली असल्याचा दावा केला. त्यांनी आठ दिवसांत घर खाली करण्याचा आदेश दिला आणि तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी लोखंडी सळईने मारहाण केल्याने लक्ष्मी कागणकर गंभीर जखमी झाल्या.

जखमी अवस्थेत कागणकर यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खानापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे बैलूर गावात संतापाची लाट उसळली असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते