तिओली रस्त्यावरील अपघातातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
तिओली (ता. खानापूर) |
तिओलीब्रीज ते तिओली या खराब रस्त्यामुळे काही महिन्यांपूर्वी दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान आज दुर्देवी मृत्यू झाला आहे.
तिओली येथील रहिवासी ह.भ.प. लक्ष्मी रामू गावडा उर्फ यल्लूबाई (वय 55) यांचा 30 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता बेळगाव येथील के.एल.ई. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
अपघातात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून त्या उपचार घेत होत्या. मात्र, आज अचानक रक्तदाब खालावल्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली.
श्रीमती गावडा या त्यांच्या कुटुंबातील आधारस्तंभ होत्या. त्यांच्या पश्चात दोन विवाहित कन्या आणि दोन अविवाहित पुत्र असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्यावर अंत्यसंस्कार गुरुवार, ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता तिवोली येथे होणार आहेत.