खानापूर

समुद्रात बुडून दोन वैद्यकीय विद्यार्थिनींचा मृत्यू

कारवार– गोकर्ण येथील जटायू तीर्थ समुद्रकिनारी गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास मोठा अपघात घडला. पर्यटनासाठी आलेल्या तामिळनाडूच्या दोन वैद्यकीय विद्यार्थिनी समुद्रात बुडून मृत्युमुखी पडल्या. मृत विद्यार्थिनींची नावे हिनुजा आणि कनीमोळे अशी आहेत.



तामिळनाडूतील तिरुची वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या २३ विद्यार्थ्यांचा गट परीक्षेनंतर गोकर्ण येथे पर्यटनासाठी आला होता. समुद्रकिनारी मौजमजा करत असताना हिनुजा आणि कनीमोळे या दोघी समुद्रात उतरल्या. मात्र, अचानक आलेल्या प्रचंड लाटांच्या विळख्यात त्या सापडल्या आणि बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेनंतर जवळील पर्यटकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. याबरोबरच जीवरक्षक व होडीवरील कर्मचाऱ्यांनीही पाण्यात उडी घेत मदतीसाठी धाव घेतली. काही पर्यटकांना त्यांनी सुरक्षित बाहेर काढले, मात्र हिनुजा आणि कनीमोळे यांना वाचवता आले नाही.

या घटनेची नोंद गोकर्ण पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?