खानापूर

नागरगाळी क्रॉसजवळ ट्रक पलटी, जखमी रुग्णालयात दाखल

खानापूर: धारवाड-रामनगर मार्गावरील नागरगाळी क्रॉसजवळ टायर वाहतूक करणारा कंटेनर ट्रक पलटी पटली होऊन या अपघातात क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे.

गोव्याहून धारवाडकडे जाणाऱ्या  चालकाने एका वळणावर नियंत्रण गमावल्याने हा अपघात झाला. ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाला, मात्र सुदैवाने समोरून कोणतेही वाहन येत नव्हते.

लोंढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेत मोठा अनर्थ टळला असून पुढील तपास सुरू आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते