खानापूर: तिओली-खानापूर मार्गावर गुरुवारी (दि. १९) सकाळी तिओली पुलाजवळ दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली.
पद्मावती परशराम पाटील (वय १७, रा. तिओली, ता. खानापूर) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती गावातील एका इसमाच्या दुचाकीवरून खानापूर येथील कॉलेजला येत होती. याचवेळी समोरून आलेल्या प्रवीण पाटील (रा. पाली, ता. खानापूर) यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेत पद्मावती रस्त्यावर फेकली गेली असून तिच्या पायाला, नाकाला व तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे.
तिला तातडीने रुग्णवाहिकेतून बेळगावमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात प्रवीण पाटील हेही जखमी झाले आहेत.