खानापूर

लोंढा येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

खानापूर : कर्जफेडीच्या त्रासाने ग्रासलेल्या बेळगावच्या वृद्धाने लोंढा (ता. खानापूर) येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. यमनाप्पा रंगाप्पा सर्वी (65) रा.बेळगावच्या वृद्धाची लोंढ्यात आत्महत्या शिवाजी कॉलनी टिळकवाडी असे त्याचे नाव आहे.

त्यांनी घर बांधण्यासाठी आपल्या मुलाच्या नावे एका फायनान्स कंपनीतूनकर्ज घेतले होते. त्याची परतफेड करणे शक्य न झाल्याने आलेल्या मानसिक तणावातून दि. 4 सप्टेंबर पासून ते बेपत्ता झाले होते.

सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लोंढा गावाजवळील कुंदिल प्रकल्पानजीक असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. खानापूर पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते