खानापूर

कणकुंबी रत्यावर पट्टेरी वाघाचे दर्शन: नागरिकांनी काढला व्हिडीओ

खानापूर: तालुक्यातील घनदाट अरण्यात ओळखल्या जाणाऱ्या जांबोटी भागातील कणकुंबी नजीक, हुळंद-कणकुंबी रस्त्यावर एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. दुचाकीवर प्रवास करणाऱ्या काही नागरिकांना भर दिवसा या वाघाला रस्त्यावर चालताना पाहण्याचा प्रसंग आला.

विशेष म्हणजे, या नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या दुचाकी थांबवून वाघाचा व्हिडिओ आणि छायाचित्रे आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहेत.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वन खात्याने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. स्थानिकांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

वन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वाघाचा ठावठिकाणा निश्चित करावा आणि स्थानिकांचे संरक्षण सुनिश्चित करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते