खानापूर

वाघाचा हल्ला, नागरगाळी पंचायत हद्दीतील घटना, दोन म्हशी दगावल्या

खानापूर: तालुक्यातील नागरगाळी (Nagargali) पंचायत हद्दीत येणाऱ्या उमरापाणी गावात वाघाचा हल्ला झाला असून दोन म्हशी मृत्युमुखी पडल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतात चरण्यासाठी गेलेल्या दोन म्हशींवर वाघाने झडप घेतल्याने या म्हशी जंगलात अर्धवट खाल्लेल्या परीस्थित सापडल्या आहेत.  

खानापूर तालुक्यातील नागरगाळी व लोंढा भागात वन्यजीवांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून एकेकाळी दुर्मीळ असलेला वाघहि आता या जंगलांची नवी ओळख बनला आहे. त्यात गवे व चितळांनीहि आघाडी घेतली आहे. तृणभक्षी वाढल्याने मांसभक्षी प्राण्यांतही आपसूकच वाढ झाली आहे. त्यामुळे, अधूनमधून मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत असताना दिसत आहे.

उमरापाणी येथे घडलेल्या या घटनेमुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

tiger attack in nagargali khanapur

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते