खानापूर
क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, व्हिडिओ आला समोर
ढाका: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अशातच आता एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला हृदयविकाराचा झटका आल्याने सध्या त्याला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.

बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालला सोमवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सामना खेळत असताना तमिमला हृदयविकाराचा झटका आला होता. सावर येथे मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यातील ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग सामना खेळत असताना त्याच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या अन् लगेचच त्याला हृदयविकाराचा झटका आला.
सामन्यासाठी त्यांना गॅस्ट्रिकच्या समस्या असल्याचे समोर आले होते. “तुम्हाला मैदानात जायची गरज नाही. थोडी विश्रांती घ्या,” असेही त्याचा साथीदार त्याला म्हणाला होता.