खानापूर

वसतिगृहात औषध सेवन करून विद्यार्थिनीची आत्महत्या

बेळगाव : बेळगाव बीम्स (BIMS) च्या वसतिगृहात एका वैद्यकीय विद्यार्थिनीने औषध घेऊन आत्महत्या केलेली घटना घडली आहे.

आत्महत्या केलेली विद्यार्थिनीचे नाव प्रिया (27) असे असून ती बेंगळुरूची रहिवासी असल्याचे समजले आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत तिने जिल्हा रुग्णालयात रुग्ण तपासणीसंदर्भात अभ्यास केला होता. मात्र, रात्री तिने आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वीही तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेच्या ठिकाणी भेट दिलेल्या बीम्सचे संचालक अशोक शेट्टी यांनी सांगितले की, प्रिया ही बेंगळुरूची मूळ रहिवासी असून ती मानसिक आजाराने त्रस्त होती. त्यामुळे ती नैराश्यात होती, अशी माहिती मिळाली आहे.

तथापि, औषध सेवन करूनच आत्महत्या झाली आहे का याबाबतचे स्पष्ट कारण शवविच्छेदनानंतरच कळेल, असे बीम्स संचालक अशोक शेट्टी यांनी सांगितले. याबाबत एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ಬೆಳಗಾವಿ : ಬೆಳಗಾವಿ ಬಿಮ್ಸ್ ವಸತಿ ನಿಲಯದಲ್ಲಿ ವೈದ್ಯಕೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಪ್ರಿಯಾ (27) ಔಷಧಿ ಸೇವಿಸಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ.
ಅವಳು ಬೆಂಗಳೂರಿನ ಮೂಲದವಳು ಎಂದು ತಿಳಿದು ಬಂದಿದೆ. ಕೆಲ ದಿನಗಳ ಹಿಂದೆಯೂ ಆತ್ಮಹತ್ಯೆಗೆ ಯತ್ನಿಸಿದ್ದಳು ಎನ್ನಲಾಗಿದೆ.
ಬಿಮ್ಸ್ ನಿರ್ದೇಶಕ ಅಶೋಕ ಶೆಟ್ಟಿ ಅವರ ಮಾಹಿತಿಯಂತೆ, ಪ್ರಿಯಾ ಮಾನಸಿಕ ಖಿನ್ನತೆಯಿಂದ ಬಳಲುತ್ತಿದ್ದರು.
ಆತ್ಮಹತ್ಯೆಯ ನಿಖರ ಕಾರಣ ಮರಣೋತ್ತರ ಪರೀಕ್ಷೆಯ ಬಳಿಕ ತಿಳಿಯಲಿದೆ.
ಎಪಿಎಂಸಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಾಗಿದೆ.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या