खानापूर

खानापुर: सरकारी ऑफीसमधील गैरकाराभाराविरोधात 27 ऑगस्टपासून उपोषण

खानापूर: निलावडे येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन
कांबळे यांनी खानापूर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात चाललेला भ्रष्टाचार तसेच गैरकाराभाराविरोधात मंगळवार दि. 27 ऑगस्टपासून तहसीलदार
कार्यालयासमोर उपोषण करण्याचे जाहीर केले आहे.  तसे निवेदन त्यांनी सर्व शासकीय कार्यालयात दिले आहे.

त्यांनी निवेदनात म्हटले आहे “तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार वाढला असून सर्वसामान्य जनता या भ्रष्टाचाऱ्याखाली भरडली जात आहे. एजेंट शिवाय तहसीलदार कार्यालयात कोणतेही काम होत नाही. साध्या सुध्या कामासाठी शेतकऱ्याकडून हजारो रुपये उकळले जातात. 

कृषी खाते, बागायत खाते, तालुका पंचायतसह सर्वच खात्यातून भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. वेळोवेळी मागणी करुनदेखील अधिकाऱ्यानी आपल्या कार्यपद्धतीत बदल केलेला नाही.

आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही याबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वालीच राहिला नसल्याने आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याने मी महात्मा गांधींच्या तत्वानुसार धरणे आंदोलन करणार आहे. याची नोंद शासकीय अधिकाऱ्यानी आणि लोकप्रतिनिधीनी घ्यावी, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?