खानापूर

खानापूर येथील लॉजमध्ये वेश्या व्यवसाय, पाच तरुणी आणि 11 तरुणांना अटक

खानापूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील SBI बँकेसमोरील निमंत्रण लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या पाच तरुणी आणि 11 तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे खानापूर पोलिसांनी शहरातील  लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या बेळगाव येथील मुलींना अटक करून महिला मदत केंद्रात पाठविले आहे. यामध्ये मालक विनायक लक्ष्मण मांजरेकर याच्याविरुद्ध अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत  तक्रार नोंदवण्यात आली आहे. याचबरोबर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.



SP डॉ. भीमाशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्पेक्टर मंजुनाथ नायक, गुन्हे अन्वेषण विभागाचे पीएसआय चन्नाबसव बबली, हेडकॉन्स्टेबल जयराम हम्मन्नावर, कर्मचारी अनुसया बसप्पानवर, ओंकारा वाढवे, मंजुनाथ मुसळी, वासुदेव पारसेकर, ईश्वर जिन्नापगोळ आदींनी या छाप्यात सहभाग घेतला होता.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते