खानापूर

दसरा सुट्टीनंतर आजपासून शाळा सुरु

खानापूर:राज्याच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने जाहीर केलेल्या दसरा सणाच्या सुट्टीचा कालावधी समाप्त झाला असून आता आजपासून शाळांच्या यंदाच्या दुसऱ्या सत्रातील शैक्षणिक पर्वाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे सर्व  पुन्हा विद्यार्थी -विद्यार्थिनींनी गजबजून जाणार आहेत.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने यंदा 3 ते 20 ऑक्टोबर 2024 या कालावधीत दसऱ्याची सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे आज सोमवारी 21 ऑक्टोबरपासून  राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत.

दसऱ्याच्या सुट्टीनंतर म्हणजे 18 दिवसानंतर आजपासून शाळा सुरू झाल्या असल्यामुळे विद्यार्थीवर्गामध्ये देखील उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आज  सकाळी  शाळा परिसरातील रस्ते पुन्हा गणवेशातील विद्यार्थी -विद्यार्थिनींनी फुलून गेलेले दिसले.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते