खानापूर
मुसळधार पावसामुळे उद्या शाळा व कॉलेजला सुट्टी
खानापूर, २४ जून —
बेळगाव जिल्हा व परिसरात सुरू असलेल्या जोरदार मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव व खानापूर तालुक्यातील सर्व शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच पदवीपूर्व महाविद्यालयांना तसेच अंगणवाडी बुधवार, 25 जून रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ही सुट्टी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशानुसार देण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, तर काही भागांत झाडे कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
पालक व विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या पुढील सूचना लक्षपूर्वक पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.