खानापूर

80 टक्के लोक सहमत असतील तर स्थलांतर करता येईल: पालकमंत्री, तालुक्याची पाहणी

खानापूर: तालुकात आणि जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संभाव्य अतिवृष्टी/पुराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आमदार आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (26 जुलै) खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त व पावसाने नुकसान झालेल्या भागांना भेट दिली.

जांबोटी रोडवरील कुसमळी पूल, त्यानंतर खानापूर ते जांबोटीला जोडणाऱ्या मध्यभागी मलप्रभा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या स्थितीची पाहणी केली.

यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, खानापूर तालुक्यातील 15 गावांची यादी करण्यात आली असून त्यांना मुलभूत सुविधा देण्यात याव्यात. अन्यथा तेथील लोकांना स्थलांतरित करण्याचा विचार करण्यात येत आहे. जर 80 टक्के लोक सहमत असतील तर त्यांना इतरत्र हलवता येईल.  असेही ते म्हणाले.

नवीन रस्ता तयार करण्यासाठी वनविभागाची परवानगी नाही. अशा परिसरात शेकडो वर्षांपासून लोक राहतात. बंगळुरूमध्ये वनमंत्री आणि स्थानिक आमदारांसोबत यापूर्वीच बैठक झाली आहे. स्थानिक परिस्थिती वनमंत्र्यांना समजावून सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले खानापूरच्या अनेक जुन्या पुलांवर खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची दुरुस्ती आणि खानापूर ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत पूल बांधण्यासाठीही निविदा मागवण्यात आल्या आहेत. पावसाळा संपल्यानंतर नवीन पूल बांधण्याची सूचना केली जाईल, असे ते म्हणाले.

यावेळी खानापूरच्या आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अंजली निंबाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते