बातम्या

शेतकऱ्यांना ३,००० भरपाईचा निर्णय : शेतकऱ्यांतून समाधान

बंगळूर : राज्यातील १७.०९ लाख लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी २८०० रुपये नुकसान भरपाई दिली जात होती. पण आता त्यात वाढ करून शेतकऱ्यांना ३ हजारांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दुष्काळ, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर महसूलमंत्री कृष्णा ब्यारेगौडा यांनी यासंदर्भात माहिती दिली.

ते म्हणाले, विशेष भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांची यादी करण्यात येणार आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विशेष नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ७ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार भरपाई देण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून एनडीआरएफची भरपाई ३,४५४ कोटी आली आहे. २७.५० लाख शेतकऱ्यांना २, ४५१ कोटी रुपये मे महिन्याच्या अखेरिस वितरित करण्यात आले आहेत. एनडीआरएफची उर्वरित रक्कम आणि राज्य सरकारच्या २७२ कोटीतून नुकसान भरपाई देण्याचा उद्देश राज्य सरकारचा आहे.

येत्या आठवडाभरात नुकसानभरपाई देण्यात येणार असून अधिकाऱ्यांकडून पूर्ण तयारी करण्यात येत आहे. आढावा बैठकीत मान्सूनसंदर्भात चर्चा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे सुरुवातीला ११५ मिमी पाउस होण्याची शक्यता होती. मात्र यावेळी १५० मिमी पाउस झाला आहे. गेल्यावर्षी ७१ टक्के पावसाची कमतरता होती. यावेळी सुरुवातीलाच सर्व ठिकाणी पाऊस झाला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, चार जिल्ह्यांमध्ये अधिक पाऊस तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाउस झाला आहे. कृषी विम्याव्दारे शेतकऱ्यांना सर्वाधिक १,६५४ कोटी भरपाई मिळाली आहे. आणखी १३० कोटी भरपाई देणे शिल्लक आहे. यावर्षी दरवर्षीपेक्षा अधिक पाउस होण्याची शक्यता हवामान खात्याच्या तज्ज्ञांनडून मिळाली आहे.

the Karnataka government on Monday decided to release Rs 3,000 each to over 17.09 lakh small farmers

Drought relief in Karnataka: ₹3000 each to be given to 17.9 lakh farmers

Drought relief: Karnataka govt to pay ₹3,000 each to small and marginal farming families

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते