खानापूर
गवळीवाडा खून प्रकरण: आरोपी जंगलात उपाशी अवस्थेत सापडला
रामनगर (प्रतिनिधी):
जोयडा तालुक्यातील शिंगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील आमसेत गवळीवाडा येथे भावजईचा खून करून फरार झालेल्या आरोपीला रामनगर पोलिसांनी अखेर अटक केली आहे.
गुरुवारी सकाळी धोंडू गंगाराम वरक (वय 55) या इसमाने आपल्या भावजईच्या डोक्यात फावड्याने वार करून खून केला होता. या घटनेनंतर धोंडू वरक हा फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी रामनगर पोलिसांकडून मोहीम राबविण्यात येत होती.
शेवटी कृष्णनगरजवळील जंगल परिसरात तो आढळून आला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन रामनगर सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी आणले.
वैद्यकीय तपासणीदरम्यान दोन दिवसांपासून त्याने काहीही न खाल्ल्याने त्याची प्रकृती खालावल्याचे आढळले. पुढील कायदेशीर कारवाई रामनगर पोलिसांकडून करण्यात येणार आहे.