खानापूर

लोंढ्यानजीक महामार्गाला मोठी धोक्याची चीर, रस्त्या पुन्हा खचण्याची शक्यता

वार्ताहर, रामनगर
बेळगाव-गोवा महामार्गावरील लोंढ्यानजीक मोहिशेठ क्रॉसनजीकच्या रस्त्यावर मोठी चीर पडली असून, सदर ठिकाणी रस्त्याचा काही भाग खाली सरकल्याचे निदर्शनास आले आहे.

या ठिकाणी दोन वर्षांपूर्वीही मोठे रस्ताखच होऊन वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर शेजारी पर्यायी मार्ग तयार करून वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. नंतर मूळ रस्त्याची दुरुस्ती करून तो पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.

मात्र, अलीकडील पावसामुळे आणि अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे पुन्हा याच ठिकाणी चीर पडल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत रस्ता पुन्हा खचण्याच्या स्थितीत असून, जर पावसाचा जोर असाच राहिला आणि अवजड वाहतूक सुरुच राहिली, तर हा रस्ता पूर्णतः खचून बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

स्थानिक प्रशासनाने या भागाची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


ರಾಮನಗರ: ಬೆಳಗಾವಿ-ಗೋವಾ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆದ್ದಾರಿಗೆ ಭಾರಿ ಚೀರ!

ಬೆಳಗಾವಿ-ಗೋವಾ ಹೆದ್ದಾರಿಯ ಲೋಡಾ ಸಮೀಪದ ಮೋಹಿಶೇಟ್ ಕ್ರಾಸ್ ಬಳಿ ರಸ್ತೆ에 ಭಾರಿ ಚೀರ ಬಿದ್ದಿದ್ದು, ರಸ್ತೆಯ ಒಂದು ಭಾಗ ಕೆಳಗೆ ಕುಸಿದಿದೆ.
ಇದೇ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಎರಡು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ರಸ್ತೆಯು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕುಸಿದಿತ್ತು. ಈಗ ಮತ್ತೆ ಚೀರ ಬಿದ್ದಿರುವುದರಿಂದ ಮಳೆಯ ತೀವ್ರತೆ ಮತ್ತು ಭಾರೀ ವಾಹನ ಸಂಚಾರ ಮುಂದುವರೆದರೆ ರಸ್ತೆ ಮುಚ್ಚುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ.

Ramnagar: Major crack near Londa on Belgaum-Goa Highway

near Mohishet Cross, close to Lonada, on the Belgaum-Goa highway.
Part of the road has sunk, and this is the same spot where the road had completely collapsed two years ago. With continued heavy rain and heavy vehicle traffic, there is a risk of the road collapsing again and becoming unusable.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या