खानापूर

शाळकरी मुलाचा नंडगड येथे तलावात बुडून मृत्यू

नंदगड ; सोमवारी, 21 ऑक्टोबर रोजी कसबा नंदगड येथील व्हन्नव्वा देवी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची नोंद नंदगड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

गर्भेनहट्टी (तालुका खानापूर) येथील रहिवासी गिरीश बसवराज तळवार (वय 14) असे बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. गिरीश सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या व्हन्नव्वा देवी मंदिराजवळील तलावात पोहण्यासाठी गेला होता. तलाव पावसामुळे पाण्याने पूर्ण भरलेला असल्याने, त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि पोहता न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. गिरीश पाण्यात बुडाल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी तातडीने तेथून जाणाऱ्या लोकांना कळवले. घटनेची बातमी परिसरात पसरताच, नंदगड परिसरातील अनेक लोक तलावाजवळ जमले. अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी 5.30 वाजता गिरीशचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला.

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?