शौर्याला सलाम : नागुर्डा गावात शहीद नायक संतोष कोलेकर यांचा पुतळा व कमान
भव्य कमानीचे अनावरण व पुतळा उद्घाटन सोहळा
मौजे नागुर्डा (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील शहीद जवान नायक संतोष नामदेव कोलेकर यांच्या गौरवासाठी गावाच्या प्रवेशव्दारावरील भव्य कमानीचे अनावरण व त्यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाचा सोहळा शनिवार, 3 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ले. कर्नल (निवृत्त) एस. एम. कणबरकर (सेना मेडल) हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खानापूरचे आमदार श्री. विठ्ठल सो. हलगेकर, श्री. निरंजन सरदेसाई (नागुर्डा) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याचबरोबर विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुतळ्याचे अनावरण मातोश्री श्रीमती लता कोलेकर व पत्नी श्रीमती किर्ती कोलेकर यांच्या हस्ते होणार आहे.
या अनावरण समारंभात आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पंच कमिटी व नागुर्डा गावकरी सहभागी होणार असून, सर्व मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शहीद जवानास आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.