खानापूर

भर रस्त्यात ग्राम पंचायत सदस्याची निर्घृण हत्या

बेळगाव : कर्ले गावात एकाचा भर रस्त्यात निर्घृण खून झाल्याची घटना सोमवार दि. 19 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मृताचे नाव मोहन गिद्दु तलवार वय 55 असे आहे.
याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, कर्ले येथील माजी ग्रामपंचायत सदस्य असलेले मोहन तलवार हे सोमवारी दुपारी किणये येथून कर्लेच्या दिशेने दुचाकीवरून येत होते.

त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी मोहन यांच्यावर धारधार शस्त्रांनी मानेवर वार करून जखमी केले. त्यामुळे मोहन हे भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यावेळी काही जणांनी या घटनेची माहिती पोलिसांना व मोहन यांच्या घरी सांगितल्याने घराच्या सदस्यांनी त्या ठिकाणी येऊन गंभीर जखमी मोहन यांना दवाखान्यात दाखल केले. मात्र घाव वर्मी बसल्याने संध्याकाळी 5.30 च्या सुमारास मोहनचा मृत्यू झाला. पुढील तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करत आहेत. ग्रामीण पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.

घटनेनंतर या भागात भीतीचे वातावरण पसरले होते. सोमवारी रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते