मिशन भीमगड दुर्गम भागातील मुलांसाठी मदतीचा हात
खानापूर: फेसबुक फ्रेंडस् सर्कलच्या पुढाकाराने आणि विविध औद्योगिक संस्थांच्या सहकार्याने खानापूर तालुक्यातील दुर्गम भीमगड वनक्षेत्रातील 9 सरकारी शाळांमधील 150 गरजू विद्यार्थ्यांना दप्तर आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
हा उपक्रम Mission Bhimgad “Bags of Love” 🎒❤️ या संकल्पनेतून राबवण्यात आला.

जे सुरुवातीला केवळ 50 दप्तरांचे छोटेखानी उद्दिष्ट होते, ते सर्वांच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने एका मोठ्या आणि हृदयस्पर्शी मोहिमेत रूपांतरित झाले. 🙏
या उपक्रमातून १५० विद्यार्थ्यांना दप्तर, वही, कंपास बॉक्ससह संपूर्ण एज्युकेशन कीट देण्यात आले,
लाभार्थी शाळांची यादी:
- जामगाव शाळा
- पोटोळी शाळा
- घोशे शाळा
- मेंडिल शाळा
- गवा ळी शाळा
- पास्तोली शाळा
- कोंगळा शाळा
- सायाचल शाळा
- मान शाळा
उद्यमबागमधील एक्सपर्ट व्हॉल्व्ज येथे पार पडलेल्या कार्यक्रमात बेळगावचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रवीण सैथ आणि सेवानिवृत्त सुभेदार मेजर सुधाकर चाळके यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. संबंधित शाळांतील शिक्षकांनी हे साहित्य विद्यार्थ्यांसाठी स्वीकारले.

याशिवाय, हॉकी बेळगाव संघाला योगा मॅट्स प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला फेसबुक फ्रेंडस् सर्कलचे सदस्य, औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध हितचिंतक उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष दरेकर (फ्रेंडस् सर्कल प्रमुख) यांना एक्सपर्ट व्हॉल्व्जचे व्यवस्थापकीय संचालक विनय लोकूर, नवज्योत टेक्नॉलॉजीजचे अमित नाईक, महेश जाधव, आणि आरईसी फ्लोचे अमर हाशिलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सामाजिक भान ठेवणारा आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दार खुले करणारा हा उपक्रम खरंच प्रेरणादायी आहे. 🙌