खानापूर

मलप्रभा नदीत बेपत्ता सूर्या मीलच्या मालकाचा मृतदेह बांबूच्या झुडपात सापडला

खानापूर: येथील मारवाडी समाजातील व सूर्या स्वामीलचे मालक दयालाल कर्षन पटेल (वय 65) हे मंगळवार, 8 जुलैपासून बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्तेमुळे कुटुंबीय आणि स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला.

मंगळवारी सायंकाळी मलप्रभा नदीच्या घाटावर त्यांची चप्पल आढळून आली, त्यामुळे त्यांचा नदीत पडल्याचा संशय बळावला. त्यानंतर नदीपात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली, मात्र काहीच हात लागलं नाही.

शेवटी, शुक्रवारी (12 जुलै) दुपारी 12 वाजताच्या सुमारास खानापूर अग्निशामक दलाच्या जवानांनी नदीत शोध घेत असताना, कुपटगिरीजवळील पुलापासून काही अंतरावर एका बांबूच्या झुडपांमध्ये अडकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.

या शोध मोहिमेमध्ये अग्निशामक दलाचे प्रभारी स्टेशन इंचार्ज सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एफ.डी. मारुती देसाई, एफ.डी. शरीफ नदाफ, मुदगाप्पा तरगार, सुनील शीमनगौडर, संजय जंगी आणि रवीकुमार मल्लूर या जवानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

अत्यंत कठीण परिस्थितीत ही कामगिरी पार पाडल्याबद्दल अग्निशामक दलाच्या जवानांचे कौतुक होत आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे मृतदेह सापडू शकला, अन्यथा तो अद्यापही शोधावाच लागला असता. या घटनेमुळे खानापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Body of Missing Surya Swamil Owner Dayalal Patel Found in Malaprabha River near KhanapurKhanapur

Khanapur – The body of Dayalal Karshan Patel (age 65), a respected member of the Marwadi community and owner of Surya Swamil in Khanapur, was found in the Malaprabha River on Friday, July 12. He had been missing since Tuesday, July 8, sparking concern among family members and locals.

Search efforts were initiated by his relatives immediately after his disappearance. On Tuesday evening, his slippers were discovered near the Malaprabha riverbank, raising strong suspicion that he may have fallen into the river. Despite intense search operations, no trace of him was found for days.

Finally, around 12:00 PM on Friday, the Khanapur fire brigade team located his body trapped beneath bamboo bushes in the riverbed, a short distance from the Kupatgiri bridge along the Belagavi-Goa highway. His body was successfully retrieved from the water with great difficulty.

The rescue operation was led by Station In-charge Sachin Shinde, along with fire department personnel FD Maruti Desai, FD Sharif Nadaf, Mudgappa Targar, Sunil Sheemangowdar, Sanjay Jangi, and Ravikumar Mallur. Their efforts are being widely appreciated, as the recovery would have been nearly impossible without their timely intervention.

The incident has left the Khanapur community in deep sorrow, and tributes are pouring in for the late Dayalal Patel.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या