खानापूर

माडिगुंजी शाळेची त्वरित दुरुस्ती करा, शाळा कमिटीने घेतली अधिकाऱ्यांची भेट

खानापूर: तालुक्यात शिक्षणाच्या बाबतित नेहमी पुढे असणारी त्याचबरोबर 120 वर्ष जुनी असलेली माडिगुंजी शाळा सध्या अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे. मागील 7 ते 8 महिन्यांपासून शाळेच्या इमारतीचे छत तुटले असून, शाळेत पाणी गळत आहे. शाळेच्या खिडक्या , शटर मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत. सध्या या शाळेत 300 ते 350 विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांना योग्य आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी संगणकांची सोय,वाचनालय, तसेच डिजिटल क्रिनची सोय करावी यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी येथील SDMC कमिटी व सामाजिक कार्यकर्ते इरफान तालिकोटी यांनी केली आहे.

सुरुवातीला शाळेच्या SDMC कमिटीने इरफान तलीकोटी यांची भेट घेऊन शाळेची समस्या मांडली. नेहमी शिक्षणाला प्राधान्य व प्रोसाहन देणारे युवा सामाजिक नेते इरफान तालिकोटी यांनी माडीगुंजी SDMC कमिटी सोबत तालुका पंचायत EO एरव्ह गौडा व बेळगांव DDPI तसेच MLC नागराज यादव यांना संपर्क साधून गुंजी शाळेसाठी निधी मंजूर करावा त्याचबरोबर शाळेची तुरंत दुरुस्ती करावी यासाठी निवेदन दिले.

यावेळी MLC नागराज यादव यांनी निवेदान स्वीकारून गुंजी शाळेला प्रत्यक्ष भेट देण्याचे व्यक्त केले.

यावेळी खानापूर तालुक्याचे युवा सामाजिक कार्यक्रते इरफान तालिकोटी, वासुदेव गोरल, एस.डी.एम.सी अध्यक्ष तानाजी गुंडू गोरल, उपाध्यक्षा सुनिता जोतिबा कुटरे, सदस्य लक्ष्मण मनोहर मादार, सदानंद परशराम बिरजे, संतोष विष्णु बिरजे, आलताफ हुसेनसाब बिच्चनावर, प्रसाद रामचंद्र घाडी, सुरेश मनोहर शिंदोळकर, सदस्या अश्विनी अमोल चौगुले, रेश्मा सदानंद कुंभार, आस्मिता राजु कोळी, दिपाली दिनेश अडकुरकर, नेत्रा संतोष देसाई आदी उपस्थित होते.

याचबरोबर ग्रामीण भागातून विविध खेळ प्रकारातील खेळाडू तयार व्हावेत. येथे चांगली शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यासाठीची सोय व्हावी, धावण्यासाठी ट्रॅक बांधण्यायात यावा. त्यादृष्टीने अत्याधुनिक सेवा-सुविधा व्हाव्यात यासाठी तालुका पातळीवरील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी खेळाडू, प्रशिक्षक व नागरिकातून होते आहे.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते