खानापूर
खानापूर तहसीलदार कार्यालयावर लोकायुक्ताची धाड
खानापूर : खानापूर तहसीलदार कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली आहे. सोमवारी दुपारी बेलगावी लोकायुक्ताचे डीएसपी बी.एस. पाटील यांच्या नेतृत्वात ही धाड टाकण्यात आली असून, विविध कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.
याआधी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तहसीलदार यांची बदली करण्यात आली होती. सध्या लोकायुक्त अधिकारी धाड टाकत असताना, यामुळे अनेक शंका निर्माण होऊ लागल्या आहेत.